मुंबई : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन पिक अवरच्या तोंडावर रेल्वेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
सांताक्रूझ-विलेपार्ले स्टेशनदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. परिणामी चर्चगेट आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद आणि धीम्या मार्गावरील गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत.
सांताक्रूझ-विलेपार्लेदरम्यान, गाड्या एकामागोमाग उभ्या आहेत. त्यामुळे ऑफिसला जाणारे मुंबईकर खोळंबळे आहेत. दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरु असल्याची माहिती, रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.