Mumbai Local Megablock Updates: रविवारी कामानिमित्ताने जर बाहेर पडणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने रविवारी सेंट्रल लाईन (Central Line) आणि हार्बर लाईनवर (Harbour Line) मेगा ब्लॉक जाहीर केला आहे.
मुख्य मार्ग:
ब्लॉक विभाग : माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत.
ब्लॉक तपशील :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. .
हार्बर लाइन:
ब्लॉक विभाग :- मानखुर्द आणि नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 पर्यंत.
ब्लॉक तपशील :-
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 ते दुपारी 3.28 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.37 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर सेवा रद्द राहतील.
ब्लॉक दरम्यान चालणाऱ्या सामान्य ट्रेनचा तपशील
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मानखुर्द सेक्शनवर विशेष लोकल चालवल्या जातील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत ट्रान्स-हार्बर / मेन लाईनवरून प्रवास करण्याची परवानगी असेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. त्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
ही बातमी वाचा: