मुंबई : मुंबईत रेल्वेचा मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. ओव्हरहेड वायर, रुळ आणि इतर तांत्रिक बाबींची देखभाल आणि दुरुस्ती यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जात आहे.
मध्य मार्ग
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11:15 ते 4:15 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. कल्याणहून अप जलद मार्गावर सकाळी 10:37 ते दुपारी 3:56 यादरम्यान निघणाऱ्या गाड्या दिवा आणि परळदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
ब्लॉकदरम्यान सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटं उशीराने शेवटच्या स्थानकावर पोहोचतील.
हार्बर मार्ग
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:30 ते 4:30 या कालावधीत मेगाब्लॉक असेल.
ब्लॉक काळात ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकासाठी ट्रान्सहार्बर सेवा सुरु राहिल, तर पनवेल आणि अंधेरी रेल्वे सेवा बंद राहणार आहे.
पश्चिम मार्ग
सांताक्रुझ ते माहीम अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:30 या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येत आहे.