Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो गणेश दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर खुशाल जा. कारण गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं (Central Railway) आज म्हणजेच, 4 सप्टेंबर 2022 रोजी रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक (Mega block) नसेल. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे देशभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच सध्या गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. रविवारी आठवडी सुट्टी असल्यानं या दिवशी बरेच लोक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगाब्लॉक राहणार नाही. 



रविवारी आठवडी सुट्टी असल्यानं दर रविवारी रेल्वेलाईनवरील कामं पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. परंतु, या रविवारी गणेशोत्सव असल्यामुळं मुंबईकरांची तारांबळ होऊ नये यासाठी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेनं घेतला आहे. रेल्वेनं ट्वीट करून रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नसेल याबाबतची माहिती दिली आहे.  


मुंबईकरांना दर रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहावं लागतं. कारण रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येतो. परंतु या रविवारी यातून मुंबईकरांना दिसाला मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तिन्ही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. 


दोन वर्षानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. आता कोरोना महामारीतून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच सणांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यातच मुंबईत गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. गणेश भक्त सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे मुंबईत मोठी गर्दी होत असते. त्यातच मुंबईकरांना लोकलचा प्रवास सोईचा आहे. त्यामुळे मुंबईकर या लोकलनेच जास्तीत-जास्त प्रवास करतात. त्यामुळे लोकांना बाहेर पडल्यानंतर वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही.