Mumbai Local Mega Block Updates : रविवार म्हणजे, मुंबईकरांच्या (Mumbai News) हक्काचा सुट्टीचा दिवस. येत्या रविवारी (22 जानेवारी) जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल, त्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचं असेल तर त्याआधी तुमच्या प्रवासाचं नियोजन करा. या रविवारी मध्य रेल्वेवर (Central Railway) हार्बर (Harbor) आणि ट्रान्सहार्बर मार्गावर (Trans Harbor) मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याचं मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तसेच, हे मेंटेनन्स मेगाब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.


ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक 



  • ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत

  • ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेल इथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत ठाणे करता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
     


हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 



  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना 22 जानेवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. 


पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक 



  • रविवारी 22 जानेवारी रोजी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

  • या ब्लॉकदरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकमुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय गाड्या रद्द राहणार आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Andheri Gokhale Bridge Demolition: अंधेरीतील गोखले ब्रिजच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगाब्लॉक; लोकलसह एक्सप्रेस गाड्याही रद्द