Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी खासकरुन जे मुंबईकर लोकलने रोज प्रवास करतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच रविवारी, 27 नोव्हेंबर रोजी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि हार्बरच्या (Harbour Railway) लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो आज घराबाहेर पडणार असाल आणि लोकलनं प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर मेगाब्लॉकबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...
माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर मार्गावर कसा आहे ब्लॉक?
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
महत्वाचं : ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.