Mumbai Local Mega Block मुंबई: पश्चिम रेल्वेवर (Western Railway) शुक्रवार आणि शनिवार रात्री पुन्हा एकदा रात्रकालीन जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेच्या 334 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर देखील मोठा बदल होणार आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी जंबो मेगा ब्लॉक घेण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवाश्यांना शुक्रवार आणि शनिवार आणि रविवारी खोळंबा होण्याची शक्यता आहे. (Western Railway Megablock Marathi News)

Continues below advertisement

ब्लॉक-1 (शुक्रवारी रात्री- 11 एप्रिल)

मार्ग-- अप-डाउन धिम्या मार्गावर रात्री ११ ते सकाळी ८.३० , अप-डाउन जलद मार्गावर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यतपरिणाम--

Continues below advertisement

- शुक्रवारी रात्री १०.२३ नंतर चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व धिम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या अप धिम्या  लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान जलद मार्गावरुन धावणार .परिणामी  महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकात थांबणार नाहीत.- विरार स्थानकातून शेवटची चर्चगेट लोकल रात्री १२.०५वाजता सुटणार.- ब्लॉक दरम्यान चर्चगेट -दादर दरम्यान लोकल जलद मार्गावरुन धावणार- ब्लॉक कालावधीत गोरेगांव - बांद्रा दरम्यान लोकल हार्बर मार्गावरुन चालविण्यात येणार.  - विरार -अंधेरी दरम्यान लोकल धिम्या-जलद मार्गावरुन धावणार- शनिवारी सकाळी ६.१० वाजता भाईंदर स्थानकातून पहिली चर्चगेट लोकल रवाना होणार. ही लोकल सांताक्रुझ ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरुन धावणार.- शनिवार  बोरीवली -चर्चगेट दरम्यान पहिली  धीमी लोकल सकाळी ८.०३ वाजता सुटणार- चर्चगेट स्थानकातून पहिली जलद लोकल सकाळी ६.१४ वाजता बोरीवलीकरिता सुटणार- चर्चगेट - विरार पहिली जलद लोकल सकाळी सव्वा सहा वाजता धावणार- चर्चगेट -बोरीवली दरम्यान पहिली  धीमी लोकल सकाळी ८.०३ वाजता सुटणार

ब्लॉक-2 (शनिवार रात्री- 12 एप्रिल)

मार्ग-- अप-डाउन धिम्या ,डाउन धिम्या मार्गावर रात्री ११.३० ते सकाळी ९,अप जलद मार्गावर रात्री ११.३० ते सकाळी ८ वाजेपर्यतपरिणाम-

- ब्लॉक दरम्यान चर्चगेट - दादर दरम्यान जलद लोकल धावणार- शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईदर बोरीवली हून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यत धावणार- चर्चगेट - विरार शेवटची लोकल रात्री १०.५३ वाजता- रविवारी विरार - चर्चगेट पहिली पहली धीमी लोकल सकाळी ८.०८ वाजता- रविवारी भाईदर  - चर्चगेट  पहिली लोकल सकाळी ८.२४ वाजता- विरार - चर्चगेट  पहिली जलद लोकल सकाळी ८.१८ वाजता- चर्चगेट- विरार पहिली जलद लोकल सकाळी ९.०३ वाजता

ही बातमीही वाचा:

Tahawwur Rana Extradition: मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार; मुंबई अन् दिल्लीत कोठड्या सज्ज