Actor Saif Ali Khan : अभिनेता सैफ आली खान (Actor Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आरोपी  विरोधात 1600 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या घटनेशी संबधित 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी आरोपपत्रात जोडली आहे. या आरोपपत्रात अभिनेता सैफअली खान, अभिनेत्री करिना कपूरसह सैफ अली खानच्या घरात काम करणारी महिला नर्स एरियामा फिलिप्स ऊर्फ लिमा यांचा जबाब महत्वाचा आहे. याशिवाय ओळख परेड अहवाल तसेच विविध न्यायवैद्यक अहवालाचा समावेश या आरोपपत्रात आहे.

आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे हा या आरोपपत्राचा भाग

याशिवाय ओळख परेडमध्ये सैफच्या घरातील नर्स एलियामा फिलिप ऊर्फ लिमा व गीता यांनी आरोपीला ओळखले होते. त्याबाबतचाही अहवाल व बोटांच्या ठशांचा अहवाल तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण व आरोपीचे चेहरा यांची न्यायवैद्यक पडताळणी करण्यात आली होती. त्याचा अहवालही या आरोपपत्राचा भाग आहे. तसेच सीसीटीव्हीतील आरोपी व अटक करण्यात आलेला शरीफुल यांच्या छायाचित्राची पडताळणी करण्यात आली होती. त्यात सीसीटीव्हीमध्ये दिसणारा व्यक्ती शरिफुल असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत 300 सीसीटीव्ही चित्रीकरण पाठवण्यात आले होते. त्यातील 25 सीसीटीव्ही चित्रीकरणाचा अहवाल होकारार्थी आला आहे. आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे पुरावे हा या आरोपपत्राचा भाग आहे. त्यात बांगलादेशी नागरिक असल्याचे ओळखपत्र व चालक परवानाही पुरावा म्हणून आरोपपत्रात सहभागी करण्यात आला आहे.

हल्ल्याच्यावेळी आरोपीच्या हातात चाकू आणि काठी 

दरम्यान, हल्ल्याच्यावेळी आरोपीच्या हातात चाकू आणि काठी होती. तसेच त्याने नर्स फिलीप यांच्याकडे एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. हल्ल्यात वापरण्यात आलेल्या चाकूचा पंचनामा व इतर गोष्टींचा समावेशही या आरोपपत्रात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. याशिवाय सीसीटीव्ही चित्रीकरण, मोबाईल लोकेशन असे तांत्रिक पुराव्यावरून शरिफुलच सैफवर हल्ला करणारा व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या घटनेशी संबधित 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी आरोपपत्रात जोडली आहे. त्यामुळं या साक्षीदारांनी नेमकी काय साक्ष दिले हे पाहणं महत्वाचं ठठरणार आहे. सैफ आली खान (Actor Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आरोपी  विरोधात 1600 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या घटनेशी संबधित 35 साक्षीदारांची साक्ष पोलिसांनी आरोपपत्रात जोडली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Saif Ali Khan Interview : 'माझ्यावरील जीवघेण्या चाकूहल्ल्याला मीच जबाबदार', चाकूहल्ल्यानंतर प्रथमच सैफ अली खानची सविस्तर मुलाखत