मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी नियमित देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याशिवाय शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री (4/5 ऑक्टोबर) भायखळा स्थानकावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने या ब्लॉकदरम्यानच्या बदललेल्या गाड्यांच्या वेळा आणि रद्द सेवांची माहिती जाहीर केली आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी हे ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ते दिलगीर आहेत.
Mumbai Local Mega Block : मेगा ब्लॉक कुठे?
मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कार्ये करण्यासाठी रविवार दि. 05.10.2025 रोजी मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येत आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहे:
माटुंगा - मुलुंड (अप आणि डाउन धीम्या मार्गावर)
11.05 ते 15.55 पर्यंत ब्लॉक राहील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 10.14 ते 15.32 दरम्यान सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.
या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
ठाणे येथून 11.07 ते 15.51 दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि माटुंगा येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. गाड्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.
हार्बर लाइन आणि ट्रान्स-हार्बर लाइन
पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) - अप आणि डाउन हार्बर मार्गावर 11.05 ते 16.05 या वेळेत ब्लॉक राहील.
हार्बर मार्गावरील विभाग
पनवेल येथून 10.33 ते 15.49 दरम्यान सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 09.45 ते 15.12 दरम्यान सुटणाऱ्या बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर सेवा रद्द राहतील.
ट्रान्स-हार्बर मार्गावरील विभाग
पनवेल येथून 11.02 ते 15.53 दरम्यान ठाण्याला जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून 10.01 ते 15.20 दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील.
ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी खंडामध्ये विशेष गाड्या चालवल्या जातील. तसेच, ब्लॉक काळात ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील. पोर्ट लाइन सेवा या काळात सुरू राहतील.
विशेष ट्रॅफिक ब्लॉक – भायखळा स्थानक
दि. 04/05.10.2025 (शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी भायखळा स्थानकावर DSS पॉइंट बदलण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल.
भायखळा स्थानकावर DSS पॉईंट क्र. 127A चे 52 किलो विभागाचे 60 किलो विभागात रूपांतर करण्याचे काम होणार आहे.
हा ब्लॉक पुढीलप्रमाणे परिचालित करण्यात येईल:
ब्लॉकची तारीख: 04/05.10.2025
कालावधी: रात्री 00.30 ते 04.30
ब्लॉक विभाग: परळ (वगळून) ते भायखळा (समावेश करून) दरम्यान अप जलद मार्गावर.
ब्लॉकमुळे गाड्यांवरील परिणाम:
शॉर्ट टर्मिनेशन:
गाडी क्र. 11020 (भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस)
गाडी क्र. 12810 (हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस)
या दोन्ही गाड्या दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील.
उशिरा धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या, विशेष गाड्या (असल्यास) किंवा नंतर कळविण्यात येणाऱ्या गाड्या या परिचालनाच्या आवश्यकतेनुसार नियंत्रित / शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील किंवा गंतव्य स्थानकावर उशिराने पोहोचतील.
पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हा मेगा ब्लॉक आवश्यक आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे.