मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून असलेली कळवा मुंब्रावासियांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आता कळवा आणि मुंब्रा स्टेशनवर देखील फास्ट लोकल थांबा होणार आहे. मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकात पीक अवर्समध्ये जलद लोकलला कळवा आणि मुंब्रा येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. 5 ऑक्टोबरपासून हे बदल लागू केले जातील. 


- सकाळी पीक अवर्स: कळवा (गाडी क्रमांक ए२०- वेळ ०८:५६ वाजता); मुंब्रा (गाडी क्रमांक एएन ८- वेळ ०९:२३ तास)
- संध्याकाळ पीक अवर्स: कळवा (ट्रेन क्रमांक बीएल ४१-वेळ १९:२९ वाजता); मुंब्रा (ट्रेन क्रमांक टीएल ४७-वेळ १९:४७ तास)


पाचवी आणि सहावी मार्गिका झाल्यानंतर देखील कळवा आणि मुंब्रा स्थानकात गर्दी असूनही फास्ट लोकल थांबत नसल्याने कळवा पारसिक प्रवासी संघ, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघ यांनी मागणी केली होती. 


खासदार श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती. कळवा पारसिक रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष सिद्धेश देसाई, उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख आणि दिवा रलेवे प्रवासी संघाचे अध्यक्ष आदेश भगत यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे. 


ही बातमी वाचा: