Mumbai Fire :  नाशिकजवळ बसमध्ये लागलेल्या आगीत होरपळून 12 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील एका इमारातीमध्ये आग लागल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ टिळकनगरमधील एका इमारतीमध्ये आगीची घटना घडली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. पोलिसांचे पथकही घटनास्थळावर पोहचलं आहे. 


आगीपासून बचाव करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. काही नागरिक इमारीतीच्या खिडकीवरील सज्जावर बसून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. इमरतीच्या तिसऱ्या अथवा चौथ्या मजल्याला आग लागल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. स्थानिकांच्या मदतीनं काही जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्थानिकांनी येथे गर्दी केली आहे. पोलीसही घटनास्थळी पोहचलेले आहेत. आग विजवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बहुमजली इमारत असून चौथ्या मजल्यासह वरच्या मजल्यालाही आग लागली आहे. किती मजल्याला आग लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. ही इमारत 20 ते 25 मजल्याची असल्याचे समोर आले आहे. 



आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  नवीन टिळक नगर रेल्वे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आगीची घटना घडली आहे. सर्वात वरच्या मजल्यालाही आग लागलेली आहे. धुराचे लोट दिसत आहेत. बचावासाठी नागरिक हात दाखवत आहेत. कुणीतरी वाचवायला या, अशा अर्त हाका नागरिकांकडून दिल्या जात आहे. खाली दोरीच्या साह्यानं लोक उतरत असल्याचं दिसत आहे. काही जणांना वाचवण्यात आले आहे. येथे प्रचंड धुराचे लोट आले आहेत. अग्निशामन दलाचे जवान अद्याप दाखल झालेले नाहीत. स्थानिक पोलिस वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्थानिकांच्या मदतीनं नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 






स्थानिक आमदार मंगेळ कुडाळकर म्हणाले की, सर्व मदत कार्य सुरु आहे. यासारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्याची परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहोत. अग्निशामन दलाच्या गाड्या निघाल्या आहेत. 


 






आणखी वाचा :
CM Eknath Shinde : नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, घटनेची चौकशी होणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nashik Bus Fire : नाशिक बस अपघातातील मृतांच्या संख्येत वाढ, संख्या बारावर, मदतकार्य सुरूच