Jayant Patil on Chandrkant Patil : मोदी, शाह हे राजकारणी आहेत. त्यांची आई-वडिलांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केलं. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आई-वडिलांना शिव्या द्या पण मोदी शाह यांना शिव्या दिल्या तर सहन करु शकत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यांचे हे वक्तव्य चुकीचं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. मराठी माणसं असं कधीही करत नसल्याचे पाटील म्हणाले.


नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील


भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्री पदावर निवड झाल्यावर पुण्यामध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये ते म्हणाले होते की, मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या मला चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही असं ते म्हणाले होते. यावर आज चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली, चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य चुकीचं असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


खरी शिवसेना कोणाची हे उद्धव ठाकरेंच्या सभेनं स्पष्ट झालं


दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे  यांच्या झालेल्या सभेनं खरी शिवसेना कोणाची आहे हे सप्ष्ट झालं असल्याचे जयंत पाटील म्हणाले. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आहे. जर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला चिन्ह दिलं तर त्यांच्या कृतीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जाईल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. शिंदे गटाकडून सभेसाठी एवढा खर्च करण्यात आला. लोकांना कोंबून मुंबईला आणल होतं. त्यांना माहिती देखील नव्हती. याची चौकशी व्हायला हवी असेही जयंत पाटील म्हणाले. 


एस टी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी कोणी फुस लावली हे समजलं असेलच


दरम्यान, निलंबीत करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा राज्य सरकारनं कामावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपल्या लक्षात येईल एस टी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी कोणी फुस लावली होती, असेही शरद पवार म्हणाले.  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी मिळाव्यात, सातवा आयोग लागू करावा, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केलं जावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ठाकरे सरकारच्या काळात संप केला होता. सरकारने अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना कामावरुन बडतर्फ करण्यात आलं होतं. तसेच महाविकास आघाडीच्या काळात ST आंदोलन खूप गाजलं होत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. 


महत्त्वाच्या बातम्या :


सुप्रियाताई तुम्ही काळजी करू नका; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फिरतात आणि सरकारपण उत्तम चालवतात : चंद्रकांत पाटील