शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुलुंड पूर्वेच्या नानेपाड्यात बिबट्या शिरला होता. काही तास उलटल्यानंतरही बिबट्याला जेरबंद करता आलं नव्हतं.अखेर, बेशुद्धीचं इंजेक्शन मारुन बिबट्याला पकडण्यात आलं.
बिबट्याच्या हल्ल्यात सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
नानेपाडा भागातीलच एका इमारतीत बिबट्या लपला होता. वन विभागाचे कर्मचारी तीन तास बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करत होते. अखेर साडेअकरा नंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं.
भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही ट्वीट करुन बिबट्या शिरल्याची माहिती दिली होती. तसंच जखमींचे फोटो शेअर केले होते.