मुंबई : एकतर्फी प्रेमातून विवाहितेची हत्या झाल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. अंधेरी स्थानकावरील पब्लिक ब्रिजवर  19 वर्षीय तरुणाने 28 वर्षीय महिलेचा जीव घेतला.


19 वर्षीय आरोपी किस्मत शेखला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. अंधेरी स्टेशनवर बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विवाहिता ब्रिजवरुन जात असताना दोन तरुण तिची वाट पाहत उभे होते. तिच्यावर धारदार शस्त्राने वार करुन दोघं आरोपी पसार झाले. तिचा मृतदेह कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी नेला आहे.

तरुणी मूळची झारखंडच्या सहीबगजची होती. आरोपी आणि तरुणी एकाच गावाचे आहेत. अंधेरीमध्ये ती आपल्या दोन मुलांसह राहत होती. काही दिवसांपासून अंधेरीतील 'गोल्ड मिनी' बारमध्ये काम करत होती.