मुंबई : मुंबईतील कमला मिल कम्पाऊण्डमध्ये लागलेल्या आग प्रकरणी मुंबई हायकोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तीन हजार तीनशे पानांच्या आरोपपत्रात तब्बल दोनशे जणांच्या साक्षींची नोंद करण्यात आली आहे. आरोपपत्रानुसार 12 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. कमला मिल आगप्रकरणी आज अतिक्रमण विभागाचे दीनेश महाले आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी संदीप शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. कमला मिल्स कम्पाऊंड आग प्रकरण कमला मिल कम्पाऊण्डमध्ये झालेल्या अग्नितांडवात 14 जणांचा बळी गेला होता, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यानंतर हॉटेल मोजोस बिस्रो आणि वन अबव्हच्या मालकांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. गुरुवार 28 डिसेंबरच्या रात्री 12.30 च्या सुमारास मोजोस पबला भीषण आग लागली होती. यावेळी येथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. संबंधित बातम्या :कमला मिल आग: शरण आलेल्या युग तुलीला बेड्याकमला मिल्स आग : 'वन अबव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटकविशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटककमला मिल अग्नितांडव : मोजोसच्या मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्तकमला मिल्स आगीतून जखमींना वाचवणाऱ्या सुदर्शन शिंदेंचा सत्कारकमला मिल आग : '1 अबव्ह' हॉटेलच्या दोन मॅनेजरना अटककमला मिल आग : '1 अबव्ह'च्या मालकांच्या काकाविरोधात गुन्हामुंबईतील अग्नितांडवाला ठाकरे कुटंबीय जबाबदार : नितेश राणेअपघात नव्हे हत्या, कमला मिलच्या आगीत 14 निष्पापांचा मृत्यूकमला मिल आग : तीन आरोपींविरोधात लूकआऊट नोटीसबीएमसीची मोजोस् बिस्त्रो आणि 1 Above विरोधात तक्रारअग्नितांडवानंतर अनधिकृत बांधकामांवर हातोडा, बीएमसीची कारवाई1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खानहॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्रीकमला मिल आग: 5 अधिकारी निलंबितभेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटीलकमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर...कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिलीमुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यूमुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ