मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर आज मध्यरात्री जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचे काही काळ हाल होणार आहेत.
कुर्ला येथील कसाईवाडा भागात रेल्वेमार्गावरुन पूर्व-पश्चिम जाणारा पादचारी पूल बांधण्यासाठी हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री 12.15 मिनिटांनी सुरु होणाऱ्या य ब्लॉकचं काम रविवारी सकाळी 6.15 मिनिटांपर्यंत सुरु राहिल.
मध्य रेल्वेवरील या जम्बो मेगाब्लॉकमुळे उद्या सकाळी मुंबईत येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईहून आज शेवटची लोकल रात्री 11.30 मिनिटांनी सुटेल. हार्बर मार्गावरील शेवटची गाडी 11.38 वाजता सुटेल. त्यानंतरच्या काही गाड्या कुर्ला स्टेशनवरुन तर सीएसटी-खोपोली ही गाडी ठाणे स्टेशनवरुन सुटणार आहे. सीएसटीहून पहिली गाडी रविवारी पहाटे 5.52 वाजता सुटेल.
या जम्बो मेगाब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील तब्बल 24 आणि हार्बर मार्गावरील 28 सेवा रद्द असतील. त्यामुळे उपनगरी प्रवाशांच्या वाट्याला खडतर प्रवास येणार आहे.
रविवारी रद्द केलेल्या गाड्या
पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील बदल
- एर्नाकुलम-मुंबई एसी स्पेशल ट्रेन रविवारी फक्त ठाण्यापर्यंतच धावेल
- भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावेल
- मंगळुरु-मुंबई एक्स्प्रेस फक्त दादरपर्यंतच धावेल
- साईनगर शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजर दादरपर्यंतच धावेल
- अमरावती-मुंबई एक्स्प्रेसही दादर स्थानकातच थांबेल
- गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस दादरपर्यंत धावेल