मुंबई : मुंबईतील चेंबूर नाक्याजवळ पाईपलाईनमधून झालेली गॅसगळती रोखण्यात यश आलं आहे. त्यामुळे एक तासाने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

चेंबूर नाक्याजवळ पाईपलाईनमधून सीएनजीची गळती झाल्याने वाहतूक ठप्प करण्यात आली होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅसगळतीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

तत्पूर्वी गॅसगळतीमुळे परिसरातील इंटरनेट बंद ठेवलं होतं. तसंच वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. दरम्यान, या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनं करण्यात आलं आहे.