Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला अखेर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आलं आहे. याच्या नामकरणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचं नाव द्यायचं यावरून वाद झाला होता. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनंतर मुंबई विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला  सावरकरांचं नाव देण्यात आलं आहे.

  


मिळालेल्या माहितीनुसार, या वसतिगृहाचं काही दिवसांआधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होत. यावेळी उदघाट्नच्या भाषणात कोश्यारी यांनी या वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव द्यावं, जेणेकरून हे कार्य इतर विद्यार्थ्यांना कळेल. जे बाहेरच्या देशातून येथे शिकायला येत आहे. त्यानुसार सूचना देखील राज्यपालांनी केल्या होत्या. त्यानंतर छात्र भारती आणि इतर संघटनांनी या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराज यांचा नाव देण्यात यावं, अशी मागणी केली होती. तसे पत्र देखील त्यांनी कुलगुरूंना पाठवलं होत.  


याच दरम्यान आज व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकर की छत्रपती शाहू महाराज कोणाचं नाव द्यावं यावर चर्चा झाली. नंतर व्यवस्थापन परिषदेने वसतिगृहा सावरकरांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. युवासेना सिनेट सदस्यांची यामध्ये तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज हे दोन्ही आमच्यासाठी पूजनीय आहेत. दरम्यान, या नामकरणाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. हा विरोधात ते आणखी आक्रमकरतेने ते मांडू शकतात.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pune Jilha parishad reservation :पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर; पहा तुमच्या गटात आणि गावात कोणते आरक्षण ?
OBC Reservation : फक्त 91 नगरपालिकांच्या बाबतीत भेदभाव नको, राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार: देवेंद्र फडणवीस
Pune Teacher recruitment scam: पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची 'ईडी' चौकशी; राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही रडारवर