Mumbai International Airport : छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर (सीएसएमआयए) आज 45 इलेक्ट्रिक वेईकल्‍सची (ईव्‍ही) पहिली तुकडी दाखल झाली. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्‍ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोकॅम) द्वारे त्यांच्या 14 व्या असोकॅम कॉन्‍फरन्‍स अॅण्‍ड अवॉर्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशनमध्‍ये शाश्‍वत प्रयत्‍नांसाठी ‘बेस्‍ट सस्‍टेनेबल एअरपोर्ट ऑफ द इअर’ पुरस्‍कारासह मान्‍यता मिळाल्‍यानंतर घोषणा करण्‍यात आली. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सीएसएमआयएने 45 ईव्ही सादर केल्या आहेत. कार्बन प्रमाण कमी करण्यासाठी आणि शाश्वत वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी विमानतळाच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे. सीएसएमआयएचा 2029 पर्यंत त्याच्या नेट झिरो मिशनचा भाग म्हणून सर्व इंधन-शक्तीवर चालणारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा मानस आहे.


हा पुढाकार सीएसएमआयएच्या ऑपरेशनल नेट झिरो योजनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्याचा उद्देश विमानतळाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्‍याचा आहे. जानेवारीमध्ये सादर करण्यात आलेल्या 45 ईव्‍हींव्यतिरिक्त, सीएसएमआयए पुढील आर्थिक वर्षात आणखी 60  ईव्‍ही तैनात करण्‍याची योजना आखत आहे, ज्‍यामध्‍ये रुग्णवाहिका, फॉरवर्ड कमांड पोस्ट, सुरक्षा व एअरसाइड ऑपरेशन्स आणि मेन्‍टेनन्‍स यूटिलिटी वाहनांचा समावेश आहे. उर्वरित वाहने टप्प्याटप्प्याने बदलण्यात येतील. सीएसएमआयए 2029 पर्यंत सीएसएमआयएच्या नेट झीरोचे समर्थन करण्याकरिता ईव्‍हींचा अवलंब करण्‍यासाठी विमानतळावर कार्यरत भागधारकांशी संलग्न होण्याची देखील योजना आखत आहे.


 नुकतेच, विमानतळाने टर्मिनल 1 वर पी 1- मल्टी लेव्हल कार पार्किंग (एमएलसीपी), टर्मिनल 2 वर पी 5 - एमएलसीपी आणि सीएसएमआयएच्या एअरसाइडवर बारा प्रबळ डीसी फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन्‍स सुरू केले आहेत. हा उपक्रम गतीशीलतेमध्ये जीवाश्म इंधन जाळल्यामुळे जवळपास 25 टक्‍के हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यामध्‍ये मदत करेल. तसेच, विमानतळावर आता एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल (एसीआय) च्‍या एअरपोर्ट कार्बन अॅक्रिडेशन (एसीए) प्रोग्रामचा हायेस्‍ट-लेव्‍हल 4 + ‘ट्रान्झिशन’ आहे. सीएसएमआयए पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्‍याप्रती कटिबद्ध आहे आणि शाश्‍वत परिवहनामध्‍ये नेतृत्‍व करण्‍यास उत्‍सुक आहे. 


सीएसएमआयए आपल्या पर्यावरण व शाश्वतता कटिबद्धता आणि ईएसजी धोरणांतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. स्थिरतेवर सतत लक्ष केंद्रित करून सीएसएमआयए दरवर्षाला प्रभावी उपाययोजना आणि टिकाऊ पद्धती हाती घेते, ज्‍यामधून जागतिक स्थिरता योजनेत योगदान देण्याचा विमानतळांचा ठाम विश्वास व जबाबदारी दिसून येते. सर्व प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव आणि आरामदायी प्रवास देताना हे प्रयत्न कार्यक्षमतेने सुरू आहेत.