स्टेशन, थिएटर, ट्रेन.. मुंबईत विनयभंगांच्या घटनांत वाढ
एबीपी माझा वेब टीम | 17 Jul 2017 06:27 PM (IST)
मुंबईत रेल्वे स्थानकांवर विनयभंगाच्या घटना घडल्यानंतर आता अभिनेत्रीही सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत मद्यधुंद व्यक्तीनं विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : मुंबईत रेल्वे स्थानकांवर विनयभंगाच्या घटना घडल्यानंतर आता अभिनेत्रीही सुरक्षित नसल्याचं दिसत आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत मद्यधुंद व्यक्तीनं विनयभंग केल्याची घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 29 जून.... सीएसटी स्थानकावर तरुणाचे हस्तमैथुन 8 जुलै.... चर्चगेट स्थानकावर तरुणीचा विनयभंग 16 जुलै.... प्रिया बेर्डेंचा चित्रपटगृहात विनयभंग गेल्या काही दिवसातल्या या घटनांनी महिला सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत. आतापर्यंत सामान्य महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या या घटना आता सेलिब्रिटींच्या बाबतीतही घडू लागल्या आहेत. मिरा रोडमधल्या एका चित्रपटगृहात अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा विनयभंग झाला.