Mumbai IIT: मुंबई आयआयटी म्हणजे देशातील एक महत्वाची शैक्षणिक संस्था आहे. मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट सीझनकडे सर्वांचं लक्ष लागून असतं. या सीझनची सुरुवात आता झाली आहे. 1 डिसेंबर ते  15 डिसेंबर दरम्यान मुंबई आयआयटीच्या प्लेसमेंट्स होणार आहेत. या प्लेसमेंट सीझनमध्ये देशातील आणि देशाबाहेरील 300 कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या प्लेसमेंट सीझनची सुरुवात सकारात्मक झालेली पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी 300 प्री प्लेसमेंट ऑफर्स विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यातील 194 ऑफर्सचा विद्यार्थ्यांनी स्वीकार देखील केला आहे. 


सीझनच्या पहिल्या दिवशी एकूण 46 कंपन्यांकडून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन मुलाखती


तर पहिल्या दिवशी एकूण अडीचशे जॉब ऑफर्सपैकी 175 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत.  प्लेसमेंट सीझनच्या पहिल्या दिवशी एकूण 46 कंपन्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.  एक्सेंचर सोल्युशन ,एअरबस इंडिया मायक्रोसॉफ्ट इंडिया मॉर्गन स्टॅन्ली, क्वालकॉम, शेल इंडिया, टेक्सास इन्स्ट्रुमेंट, टाटा स्टील या कंपनीचा पहिल्या दिवशीच्या प्लेसमेंट सीझनमध्ये सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. 


दरवर्षी मुंबई आयआयटी कडून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात प्लेसमेंट सीझन सुरू होतो.  ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोटींमध्ये पॅकेजेस मिळतात. काही विद्यार्थ्यांना मिळणारी पॅकेजेस तर माध्यमांमध्ये चर्चेत देखील येतात.


अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सुद्धा सहभाग


देशातील टॉपच्या कंपन्या या प्लेसमेंट सीझनमध्ये सहभागी होतात, शिवाय या प्लेसमेंट सीझनमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सुद्धा सहभाग असतो. या कंपन्या मुंबई आयआयटीमध्ये अंतिम वर्षात  शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी नोकरीची संधी देतात. या संधीमुळेच मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थी मेहनत घेत असतात.


गेल्या वर्षी रेकॉर्डब्रेक प्लेसमेंट मिळालेल्या


2019-20साली विद्यार्थ्यांनी 1 हजार 172 जॉब ऑफर्स स्वीकारल्या होत्या त्यानंतर 2020- 21 मध्ये स्वीकारण्यात आलेल्या ऑफर्सची संख्या कमी झाली आणि ती 973 वर आली. तर 2021-22 मध्ये रेकॉर्ड ब्रेक 1362 जॉब ऑफर स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी पहिल्या सीझनमध्ये किती ऑफर्स विद्यार्थ्यांकडून स्वीकारल्या जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी देखील वाचा