मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राच्या वादावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाने फटकारलं आहे. दोन वेळा समन्स बजावूनही गैरहजेरी लावल्याने कोर्टाने राऊत यांचा चांगलंच धारेवर धरलं आहे.
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद कोर्टात सुरु आहे. त्या प्रकरणी दोन वेळा समन्स बजावूनही संजय राऊत मुंबई हायकोर्टात हजर झाले नाहीत. शिवाय कोर्टाच्या समन्सला राऊतांनी उत्तरही दिलं नाही.
कोर्टाला उत्तर न दिल्यामुळे संजय राऊत यांना अखेर तंबी देण्यात आली आहे. संजय राऊत हजर झाले नाहीत तर त्यांना आणण्यात येईल असं हायकोर्टानं बजावलं आहे.
17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेबांचे निधन झाले. त्यांचे मृत्यूपत्र प्रमाणित करून घेण्यासाठी उद्धव यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतल्याने यावर न्यायाधीश पटेल यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. हे मृत्यूपत्र तयार करताना बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली होती. त्यांची दिशाभूल करून हे मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे. मृत्यूपत्र प्रामणित करून घेण्यासाठी उद्धव हे न्यायालयात अर्ज करू शकत नाही, असा दावा जयदेव यांनी केला आहे.