मुंबई: मुंबईतल्या रस्त्यावर यापुढे खड्डे पडणार नाहीत असं कंत्राटदाराकडून लिहून घ्या. असे आदेश मुंबई हायकोर्टानं पालिकेला दिले आहेत. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास झाल्याचा अनुभव न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांनी सुनावणीच्या वेळी सांगितलं.

 

दक्षिण मुंबई ते बोरिवलीचा प्रवास खड्ड्यांमधून करावा लागतो. त्यामुळे हा त्रास झाल्याचा किस्साही कानडे यांनी सांगितला. दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. मात्र त्याची वेळेवर देखभाल केली जात नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचं प्रमाणही वाढलं आहे.

 

वाहतूक कोंडी आणि अपघाताचं वाढतं प्रमाण पाहता कोर्टानं आता खड्ड्याची जबाबदारी कंत्राटदारावर निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आतातरी मुंबईतले खड्डे कमी होणार का? असा प्रश्न आहे.