Mumbai Rains: मुंबईत काल रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. दक्षिण मुंबईतील पाणी तुंबण्याचे हॉटस्पॉट असलेल्या हिंदमाता, किंग्ज सर्कल, माटुंगा, फाईव्ह गार्डन आणि हिंदू कॉलनी परिसरात पाण्याचा निचरा न झाल्याने (Water Logging) मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) या पाण्याचा निचरा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेने पंप लावून पाण्याचा उपसा केला असला तरी पाण्याचा निचरा वेगाने होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आता रस्त्यावरील मॅनहोल उघडून पाण्याचा निचरा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, हे काम करताना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. (Mumbai Rain news)
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून जीव धोक्यात घालून पाण्याला वाट करून दिली जात आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागातील रस्त्यावर पाणी भरले. दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी (Hindu Colony) परिसरातील रस्तेही पाण्याखाली गेल्याचे पाह्यला मिळाले. अशातच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकण उघडण्यात आली आहेत. या मॅनहोलमध्ये कोणाचा अपघात होऊ नये, म्हणून पालिकेचे कर्मचारी झाकणाभोवती बसून राहिले आहेत.
मुसळधार पावसात स्वत:चा जीव धोक्यात घालुन मुंबईकरांच्या सुरक्षेकरता मॅनहोलभोवती पहारा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसाळ्यात उघड्या मॅनहोलमध्ये अनवधानाने पडून अनेक जीवघेणे अपघात होतात. त्यामुळे उघड्या मॅनहोलच्या आजुबाजूनं जाणाऱ्या मुंबईकरांना सावध करण्यासाठी बीएमसी कर्मचाऱ्याने मॅनहोलच्या झाकणावरच बसून पहारा दिला. मात्र, यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक मिरवणाऱ्या मुंबईच्या नावाला बट्टा लागला आहे. महानगरपालिकेकडे पाण्याचा उपसा करणारे मोठ्या क्षमतेचे पंप आणि आधुनिक यंत्रसामुग्री असूनही कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.
Heavy Rain in Mumbai: मुंबईत तुफान पाऊस
मुंबई आणि उपनगरात रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईतील पावसाचा जोर आणखी वाढला होता. त्यामुळे सकाळपासूनच रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली होती. या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
आणखी वाचा
Mumbai Heavy Rain: मुंबईला रेड अलर्ट, पुढील तीन तास महत्त्वाचे; रेल्वे ट्रॅक, रस्ते पाण्याखाली