मुंबई : मुंबई पुन्हा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. अंधेरीच्या अंबोलीमधील शामनगर परिसरात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला.


महिला आणि तिचा पती एका महिलेल्या मदतीने शामनगरमधील झोपडपट्टीत घर शोधत होते. रात्री ते दाम्पत्य महिलेच्या घरातच थांबलं. मात्र त्याच परिसरातील 20 ते 5 वर्ष वयाच्या आठ जणांनी रात्री महिलेवर बलात्कार केला.

पीडित महिला दोन मुलांची आई आहे. आरोपींनी महिलेच्या पत्नीला बंधक बनवलं. चार आरोपींनी बलात्कार केला तर चार जणांनी या गुन्ह्यात त्यांना साथ दिली.

या प्रकरणी अंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी गुन्हेगार पार्श्वभूमीचा आहे. एक आरोपी पसार झाला.