मुंबई : मुंबईच्या सीएसएमटीजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी आहेत. या घटनेवर पंतप्रधान मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं. तर दुसरीकडे एका भाजप नेत्याने या घटनेचं खापर पादचाऱ्यांच्या डोक्यावर फोडलं.


संजू वर्मा असं या भाजपच्या महिला नेत्याचं नाव आहे. टाइम्स नाऊच्या एका शोमध्ये बातचीत करताना संजू वर्मा यांनी सुरुवातील हे नैसर्गिक संकट असल्याचं सांगितलं. त्यानंतर या दुर्घटनेशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचं सांगत हात वर करण्याचा प्रयत्न केला. पण या दुर्घटनेसाठी पादचारीच जबाबदार असल्याचं सांगितलं.


संजू वर्मा यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणीही केली. "घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईलच, मात्र आज संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कुणाची आहे, हे निश्चित करा," असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. "पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असूनही अशा घटना होत आहेत, हे दुर्दैवी आहे. यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल," असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. पुलाचा भाग कोसळल्याने तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) मोहन कायगुंडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघी महिला जीटी हॉस्पिटलच्या कर्मचारी होत्या.

दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावं

मृतांची नावं
1. अपूर्वा प्रभू (वय 35 वर्ष)
2. रंजना तांबे (वय 40 वर्ष)
3. जाहिद सिराज खान (वय 32 वर्ष)
4. भक्ती शिंदे (वय 40 वर्ष)
5. तपेंद्र सिंह (वय 35 वर्ष)
6. मोहन कायगुंडे (वय 40 वर्ष)

जखमींची नावं
1. सोनाली नवले (30 वर्ष)
2. अध्वित नवले
3. राजेंद्र नवले (33 वर्ष)
4. राजेश लोखंडे (39 वर्ष)
5. तुकाराम येडगे (39 वर्ष)
6. जयेश अवलानी (46 वर्ष)
7. दीपक पारेख
8. महेश शेरे
9. अजय पंडित (31 वर्ष)
10. हर्षदा वाघळे (35 वर्ष)
11. विजय भागवत (42 वर्ष)
12. निलेश पाटावकर
13. परशुराम पवार
14. मुंबलिक जैसवाल
15. मोहन मोझाडा (43 वर्ष)
16. आयुषी रांका (30 वर्ष)
17. सिराज खान
18. राम कुपरेजा (59 वर्ष)
19. राजेदास दास (23 वर्ष)
20. सुनील गिर्लोटकर (39 वर्ष)
21. अनिकेत अनिल जाधव (19 वर्ष)
22. अभिजीत माना (31 वर्ष)
23. राजकुमार चावला (49 वर्ष)
24. सुभाष बॅनर्जी (37 वर्ष)
25. रवी लगेशेट्टी (40 वर्ष)
26. नंदा विठ्ठल कदम (56 वर्ष)
27. राकेश मिश्रा (40 वर्ष)
28. अत्तार खान (45 वर्ष)
29. सुजय माझी (28 वर्ष)
30. कानुभाई सोलंकी (47 वर्ष)
31. अनोळखी

संबंधित बातम्या :

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, सहा जणांचा मृत्यू, 32 जखमी

होय तो पूल आमचाच आहे, टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली

मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी

CSMT Bridge Collapse : दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावं

'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे

पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप

बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका

सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे