मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सीएसएमटी पूल दुर्घटनेतील जखमींची सेंट जॉर्ज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. तसेच घटनास्थळी जाऊन पुलाची पाहणीही केली. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईलच, मात्र आज संध्याकाळपर्यंत पूल दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कुणाची आहे, हे निश्चित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं असूनही अशा घटना होत आहेत, हे दुर्दैवी आहे. यासंदर्भात चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही अशा घटना होत असल्याने ऑडिटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या घटनेत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.



मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब कोसळला

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा भाग गुरुवारी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले माहिती आहे. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावं

मृतांची नावं


1. अपुर्वा प्रभू (35 वर्ष)
2. रंजना तांबे (40 वर्ष)
3. जाहीद सिराज खान (32 वर्ष)
4. भक्ती शिंदे (40 वर्ष)
5. तपेंद्र सिंह (35 वर्ष)
6. मोहन कायगडे (40 वर्ष)


जखमींची नावं


1. सोनाली नवले (30 वर्ष)
2. अध्वित नवले
3. राजेंद्र नवले (33 वर्ष)
4. राजेश लोखंडे (39 वर्ष)
5. तुकाराम येडगे (39 वर्ष)
6. जयेश अवलानी (46 वर्ष)
7. दीपक पारेख
8. महेश शेरे
9. अजय पंडित (31 वर्ष)
10. हर्षदा वाघळे (35 वर्ष)
11. विजय भागवत (42 वर्ष)
12. निलेश पाटावकर
13. परशुराम पवार
14. मुंबलिक जैसवाल
15. मोहन मोझाडा (43 वर्ष)
16. आयुषी रांका (30 वर्ष)
17. सिराज खान
18. राम कुपरेजा (59 वर्ष)
19. राजेदास दास (23 वर्ष)
20. सुनील गिर्लोटकर (39 वर्ष)
21. अनिकेत अनिल जाधव (19 वर्ष)
22. अभिजीत माना (31 वर्ष)
23. राजकुमार चावला (49 वर्ष)
24. सुभाष बॅनर्जी (37 वर्ष)
25. रवी लगेशेट्टी (40 वर्ष)
26. नंदा विठ्ठल कदम (56 वर्ष)
27. राकेश मिश्रा (40 वर्ष)
28. अत्तार खान (45 वर्ष)
29. सुजय माझी (28 वर्ष)
30. कानुभाई सोलंखी (47 वर्ष)
31. अनोळखी


संबंधित बातम्या :

मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, सहा जणांचा मृत्यू, 32 जखमी

होय तो पूल आमचाच आहे, टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली

मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

पूल कोणाचा? रेल्वे प्रशासनाची आणि पालिकेची एकमेकांवर टोलवाटोलवी

CSMT Bridge Collapse : दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावं

'तो' पूल 100 टक्के धोकादायक नव्हता, दुर्घटनेची चौकशी केली जाईल : विनोद तावडे

पुलाचे ऑडिट झाले नाही, या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार : स्थानिक नगरसेविकेचा आरोप

बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी लोकांच्या जीवाची पर्वा करावी, धनंजय मुंडेंची टीका

सीएसएमटीजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, पाहा घटनास्थळाची छायाचित्रे