Mumbai Metro : मुंबई म्हटलं की, वाहतूक कोंडी... मुंबईकर सध्या वाहतूक कोंडीमं त्रस्त आहेत. अशातच ट्रॅफिक कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणून सर्वजण मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची सर्वचजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो (ॲक्वा लाईन) 24 जुलैपासून सुरू होणार असे ट्विट भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले होते. मात्र, काही तासांतच त्यांनी आपले ट्विट डिलिट केलं आहे. भूमिगत मेट्रोचा 33.5 किमीचा भाग आरे कॉलनीपासून सुरू होतो. या मार्गावर तब्बल 27 स्थानकं असणार आहेत. विनोद तावडे यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती, पण काही वेळातच हे ट्विट डिलिट केलं.

  






मुंबईच्या या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पात 33.5 किमी लांबीचा भुयारी मार्ग असेल. हा मार्ग आरे कॉलिनी येथून सुरू होईल. एकूण 27 स्थानकं असतील. त्यापैकी 26 स्थानकं भूमिगत असणार आहेत. या मेट्रो मार्गाचं काम 2017 मध्ये सुरू झालं होतं. मात्र, कोरोनामुळे हे काम बरेच दिवस रखडलं होतं. खोदकामातून एकूण 56 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या मार्गावरील पहिला टप्पा आरे कॉलिनी ते बीकेसी (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स) आहे. पहिला टप्पा 24 जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.


मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत कोणती स्थानकं आहेत? 


मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 27 स्थानकं असणार आहेत. 56 किलोमीटरपेक्षा जास्त लांब हा मार्ग आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या संपूर्ण मार्गावरील तब्बल 26 स्थानकं भूमिगत असणार आहेत. 



  • कफ परेड (Cuffe Parade)

  • विधान भवन (Vidhan Bhavan)

  • चर्चगेट (Churchgate)

  • हुतात्मा चौक (Hutatma Chowk)

  • सीएसटी मेट्रो (CST Metro)

  • काळबादेवी (Kalabadevi)

  • गिरगाव (Girgaon)

  • ग्रँड रोड (Grant Road)

  • मुंबई सेंट्रल मेट्रो (Mumbai Central Metro)

  • महालक्ष्मी (Mahalaxmi)

  • सायन्स म्युझियम (Science Museum)

  • आचार्य अत्रे चौक (Acharya Atre Chowk)

  • वरळी (Worli)

  • सिद्धिविनायक (Siddhivinayak)

  • दादर (Dadar)

  • शितलादेवी (Shitaladevi)

  • धारावी (Dharavi)

  • बीकेसी (BKC)

  • विद्यानगरी (Vidyanagari)

  • सांताक्रूझ (Santacruz)

  • डोमेस्टिक एअरपोर्ट (Domestic Airport)

  • सहार रोड (Sahar Road)

  • आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट (International Airport)

  • मोरळ नाका (Marol Naka)

  • एमआयडीसी (MIDC)

  • सीप्झ (SEEPZ)

  • आरे कॉलनी (Aarey Depot)


ट्रेनच्या वेळा काय आहेत? 


भूमिगत मेट्रो सेवा सकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. ताशी 90 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेन्स दर काही मिनिटांनी प्रवाशांसाठी उपलब्ध होतील असं अहवालात म्हटलं आहे.


दरम्यान, भाजप नेते विनोद तावडे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. मात्र, याबाबत अद्याप एमएमआरडीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, महाराष्ट्र सरकारकडूनही यासंदर्भात काहीच सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.