Mumbai Fire LIVE: लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला आग; वाचा प्रत्येक अपडेट्स

Mumbai Lalbaug Fire : मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

abp majha web team Last Updated: 22 Oct 2021 01:05 PM
आदित्य ठाकरे लागेल्या इमारतीकडे रवाना

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आदित्य ठाकरे सह्याद्रीवरून निघाले आहेत. इमारतीला आग लागली आहे त्या ठिकाणी काही वेळात पोहोचतील. 

इमारतीची फायर फायटीग सिस्टीम कार्यररत नव्हती : महापौर

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. इमारतीची फायर फायटीग सिस्टीम कार्यररत नव्हती, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे. 

लालबागमधील इमारतीला लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी उडी मारून मृत्यू

लालबागमधील करी रोड रेल्वे स्टेशनजवळ लालबाग मुंबई येथील वन अविघ्न पार्क, 19व्या मजल्यावरील घरामध्ये आग लागली असून सदर घटनास्थळी पोलीस कर्मचारी, मुंबई अग्निशमन दलाचे 15 फायर वाहन आणि वॉटर टँकर, 1 रुग्णवाहिका इत्यादी वाहनं उपस्थित आहेत. सदरची आग लेवल-3 ची असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचं काम चालू आहे. सदर दुर्घटनेत एका व्यक्तीचा इमारतीवरून उडी मारून मृत्यू झाला असून त्याचे नाव अरुण तिवारी (30) असं आहे.  

अग्नीशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल

वन अविघ्न मुंबईतील लालबाग परिसारातील गगनचुंबी इमारत. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. लेव्हल तीनचा कॉल आगीचं स्वरुप भीषण असताना दिला जातो. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

Mumbai Lalbaug Fire : मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. भीषण आगी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. 

पार्श्वभूमी

वन अविघ्न इमारतीच्या 21व्या मजल्यावरुन एका व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली. या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, मुंबईच्या महापौर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तर 19व्या मजल्यावर लागलेली आग 5व्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. इमारतीचे अनेक मजले आगीनं आपल्या कवेत घेतले आहेत.

अग्नीशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमरातीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अगदी चिंचोळा असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पण आगीपर्यंत पोहोचण्यात अग्नीशमन दलाला जिकरीचं होतं आहे. आगीत आतापर्यंत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.