आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईतील गोरेगाव भागात इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या आणि 6 पाण्याचे टँकर घटनास्थळी आहेत. आतमध्ये अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. गोरेगावमधील ओबेरॉय मॉलजवळ असलेल्या इटालियन इंडस्ट्रियल इस्टेटच्या गोडाऊनला ही आग लागली. सकाळी लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. या आगीत 2 गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता आहे. आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.