मुंबईत अंधेरीमधील लाकडाच्या गोदामाला आग
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2018 07:16 PM (IST)
पश्चिम रेल्वेच्या रुळाला लागूनच हे गोदाम असल्यामुळे लोकल रेल्वेला याची झळ पोहचण्याची भीती व्यक्त केली जात होती

मुंबई : मुंबईमध्ये आग लागण्याचं सत्र काही थांबता थांबत नाही. अंधेरीतील आंबोली भागात एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एसव्ही रोडवर टिंबर मार्ट या लाकडाच्या गोदामाला ही आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 फायर इंजिन आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं कारण अद्यापही स्पष्ट नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या आगीत कोणीही अडकल्याचं वृत्त नाही. पश्चिम रेल्वेच्या रुळाला लागूनच हे गोदाम असल्यामुळे लोकल रेल्वेला याची झळ पोहचण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र सध्या लोकलची वाहतूक सुरळीत सुरु आहे.