Mumbai Drugs Case LIVE Updates : बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर; सर्व घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Mumbai Drugs Case LIVE Updates : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी सध्या एनसीबीनं आपला कारवाईचा सपाटा सुरु ठेवला आहे.

abp majha web team Last Updated: 21 Oct 2021 01:35 PM

पार्श्वभूमी

NCB at Shahrukh Khan House : एनसीबीकडून शाहरुख खानच्या 'मन्नत'वर छापा, सर्च ऑपरेशन सुरुमुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. अशात एनसीबीकडून याप्रकरणी...More

अनन्या पांडेच्या घरी एनसीबीकडून लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त

आज एनसीबीच्या पथकानं अनन्या पांडेच्या घरी छापेमारी केली. तसेच दुपारी दोन वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्सही बजावलं आहे. अशातच एनसीबीनं अनन्याच्या घरी केलेल्या छापेमारीत लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त केले आहेत. 


आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून बॉलिवूडच्या आताच्या यंग सिनेकलाकारांमधील प्रसिद्ध अशा अनन्या पांडेच्या घरीही छापेमारी करण्यात आली. याशिवाय, दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी एनसीबीनं समन्स बजावलंय. त्यामुळे एनसीबी बॉलिवूडमधील आणखी कोण-कोणत्या बड्या चेहऱ्यांवर कारवाई करणार, याकडे सिनेसृष्टीसह सामान्य जनतेचंही लक्ष लागलं आहे.