Mumbai Drugs Case LIVE Updates : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण; प्रत्येक घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Mumbai Drugs Case LIVE Updates : क्रूझ ड्रग्स प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणी सध्या अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होताना दिसत आहेत. या प्रकरणाशी संबंधित सर्व घडामोडी फक्त एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 28 Oct 2021 07:56 AM

पार्श्वभूमी

KP Gosavi Arrested : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पंच प्रभाकर साईलच्या (Prabhakar Sail) आरोपांमुळे या प्रकरणाला अनेक वळणं मिळाली आहेत. अशातच साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर...More

Exclusive : समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची माध्यमांना प्रतिक्रिया

Aryan Khan Drugs Case : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात वसुली केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन सध्या चर्चांना उधाण आलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरीही रंगल्या आहेत. अशातच समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नी डॉक्टर शबाना कुरेशी यांचे वडिल डॉक्टर जाहिद कुरेशी यांनी एबीपी न्यूजसोबत खास बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले की, हे लग्न अरेंजमॅरेज होतं, लव्ह मॅरेज नव्हतं. लग्नापूर्वी तीन-चार वर्ष अगोदर आम्ही एकमेकांना ओळखत होतो आणि हे देखील माहीत होतं की, ते कुटुंब मुस्लिम आहे. ते म्हणाले की, ते आमच्याकडे मुस्लिम बनून आले होते.


जाहिद कुरेशी म्हणाले की, त्यावेळी समीर वानखेडे यूपीएससीची तयारी करत होते आणि नमाज पठणानासाठी मशिदीतही जात होते. ते म्हणाले की, आम्हालाही माध्यमांमधून समजलं की, ते हिंदू आहेत. जाहिद म्हणाले की, आमच्या मुलीचा घटस्फोट झाल्यानंतर या दुःखातून आम्ही सावरलो होतो. परंतु, जेव्हा हे प्रकरण माध्यमांसमोर आलं त्यावेळी मात्र बोलावं लागलं.