मुंबई : मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस उप आयुक्त लेव्हलच्या बदल्या 48 तासांच्या आत स्थगित करण्याची सरकारवर नामुष्की आलीय. 2 जुलै रोजी मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. तीन दिवसानंतरच या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्याचे कळते. या बदल्या गृहमंत्री म्हणजे राष्ट्रवादीने केल्याचे कळते. त्यातील एकूण गोष्टी लक्षात घेता. पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत होत्या.


मात्र, सूत्रांची माहिती आहे की या बदल्या गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना विश्वासात घेउन केल्या गेल्या. मात्र, या बदल्या करण्याआधी मुख्यमंत्री यांना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप करत शिनसेना नेते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांची काही अधिकाऱ्यांच्या नावाला नापसंती होती, जे बदल्यांचे आदेश आल्यानंतर नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्या बदल्या थांबवून नवीन ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहेत, असं सांगितलं जात आहे.


संजय राऊत यांनी 12 आमदारांची चिंता करू नये तर महाराष्ट्राची काळजी करावी : देवेंद्र फडणवीस


DCP बदल्या रद्द करण्यामागे सेना नेत्यांचाही विरोध कारणीभूत




  • मर्जीचा अधिकारी न मिळाल्याने सेनेच्या विभागप्रमुख, आमदार, खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे कुरबुर सुरू केली होती.

  • अनिल देसाई, शिशिर शिंदे, पांडुरंग सकपाळ यांनी बदलीबाबत नापसंती व्यक्त केली असल्याचं समजतंय.

  • आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्याआधी ती फाइल गृहमंत्री व मुख्यमंत्री दोघांकडे जाण आवश्यक असते किंवा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेणे आवश्यक असत, तसं या बदल्या करताना केलं गेल नाही, असाही आरोप शिवसेनाच्या काही नेत्यांनी केला आहे.

  • त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी केल्या रद्द.


मात्र, पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंतर्गत बदल्या करण्याचा अधिकार मुंबई आयुक्तांना असतो. त्या अधिकाराचा वापर करत मुंबई आयुक्त परम्बीर सिंह यांनी या बदल्या रद्द केल्या. यासाठी गृहमंत्र्यांना ही विश्वासात घेतल्याचं सांगितलं जात आहे. आपण गृह विभागाला देखील ही माहिती देण्यात आल्याचं कळतय. मात्र, या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांची नावं अशी होती ज्याच्यावर शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांनी देखील शंका उपस्थित केली. त्यामुळे या बदल्या थांबवण्यात आल्या आणि बदल्या संदर्भात नवीन आदेश येईपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या ठिकाणी पोस्टिंगचे आदेश देण्यात आले. त्यामुळे तीन दिवसापूर्वी करण्यात आलेल्या मुंबई पोलीस उपायुक्तांच्या बदल्या आता रद्द करण्यात आल्या आहेत.


गृहमंत्री अनिल देशमुख यांची सारवासारव


मुंबईतील 10 पोलीस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या.  या बदल्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्या ऑफिसकडून स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.



ज्या अधिकाऱ्यांनच्या बदल्या करण्यात आले त्यांची नाव आणि बदलीचे ठिकाण


1) परमजीत सिंह दहिया आधी झोन 7 मध्ये होते, त्यांची झोन 1 मध्ये ट्रान्सफर करण्यात आली होती.


2) प्रशांत कदम संरक्षण खात्यात होते, ज्यांना झोन 7 मध्ये ट्रान्सफर करण्यात आलं होतं.


3) गणेश शिंदे आधी SB 1 चे उपायुक्त होते, ज्यांना पोर्ट झोन मध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते.


4) रश्मी करंदीकर यांना पोर्ट झोन मधून सायबर विभागात ट्रान्सफर देण्यात आली होती.


5) शहाजी उमप यांनची डिटेक्शन मधून SB 1 मध्ये बदली करण्यात आली होती.


6) मोहन दहिकर झोन 11 मधून डिटेक्शन ला ट्रान्स्फर करण्यात आली होती.


7) विशाल ठाकूर यांची सायबर खात्यातून झोन 11 मध्ये बदली करण्यात आली होती.


8) संग्राम सिंह निशाणदार झोन 1 मधून मुंबई पोलीस ऑपरेशन खात्यात बदली करण्यात आली होती.


9) प्रणय अशोक मुंबई पोलीस ऑपरेशन खात्यातुन झोन 5 मध्ये बदली करण्यात आली होती.


10) नंदकुमार ठाकूर LA तारदेव येथून पाठवला आहे पोलीस हेडकॉटर वन या ठिकाणी बदली करण्यात आली होती.


तर पोलीस हेडकॉटर 1च्या उपायुक्त एन अंबिका यांची बदली झोन 3 मध्ये करण्यात आली होती.


पुढील आदेश येईपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या कर्तव्याच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, राज्य सरकारच्या आपसी वादामुळे तर या बदल्या रद्द झाल्या नाहीत ना असा प्रश्न चिन्ह निर्माण केला जात आहे?