मुंबई : आतापर्यंत आम्ही ठाकरे गटाशी प्रामाणिक राहिलो आहोत, पण यंदा आम्ही ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार नाही (Mumbai Dabbawala on Shivsena Darasa Melava ) असं मुंबईतल्या डबेवाल्यांनी स्पष्ट केलं आहे. आधी मराठा आरक्षण आणि मगच पक्ष अशी भूमिका डबेवाल्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबई डबेवाले आज शिवतीर्थावर दसरा मेळाव्याकरता जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. 


डबेवाल्यांची भूमिका काय? (Mumbai Dabbawala) 


आम्ही बहुतांश डबेवाले आणी डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रामाणिक राहीलो आहे आणि या पुढेही राहू. परंतु मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी पहाता आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम पहाता या वर्षी डबेवाले शिवतिर्थावर मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. पहिला मराठा आरक्षण आणि मग नंतर पक्ष, अशी भूमिका आमची आहे. मराठा आरक्षण हा आमच्या मराठा जातीचा लढा आहे आणि तो लढा आम्हालाच लढावा लागणार आहे. 


सध्या या लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांनी दिली.  आम्हाला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य असल्यामुळे  शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आम्ही वाजत गाजत, गुलाल उधळत जात होतो. मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. परंतु मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला आहे. पहिला मराठा आरक्षण मग पक्ष, ही भूमिका आमची राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला शक्य तितके बळ देण्याचा प्रयत्न आमचा राहील असंही डबेवाल्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


ठाकरे गटाचे कोणते शिलेदार भाषण करणार?


दसरा मेळाव्याचे निवदेन आणि सूत्रसंचालन आदेश बांदेकर करणार आहेत. त्याशिवाय, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रमुख भाषण असणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत (Sanjay Raut), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांची नावे वक्त्यांच्या यादीत असल्याची चर्चा आहे. 


ही बातमी वाचा: