Cruise Drugs Case LIVE Updates : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...

Mumbai Cruise Drugs Case LIVE Updates : मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एक गौप्यस्फोट केलाय. जाणून घ्या क्षणाक्षणाचे अपडेट्स एका क्लिकवर...

abp majha web team Last Updated: 08 Nov 2021 11:05 AM
क्रांती रेडकर यांची पत्रकार परिषद रद्द 

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांची पत्रकार परिषद रद्द होणार आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार होत्या. क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यामुळे क्रांती रेडकर आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु, आता त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. 

मेहुणीसंदर्भातील मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचं उत्तर, म्हणाले, 'ते' प्रकरण घडलं त्यावेळी सेवेतही नव्हतो

Mumbai Drugs case updates : नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या मेहुणीबाबत केलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी या प्रकरणाशी त्यांचा संबंध कसा काय असू शकतो? असा प्रतिप्रश्न केलाय. हे प्रकरण झालं तेव्हा म्हणजे 2008 मध्ये आपण सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकर यांच्याशी 2017 साली विवाह झाला, असं वानखेडे यांनी म्हटलंय. त्यामुळे या खटल्याशी आपला या प्रकरणाशी कसा संबंध असू शकतो, असा सवाल वानखेडे यांनी केला आहे.


दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आधी नवऱ्यावर आरोप झाल्यानंतर आता क्रांतीच्या बहिणीवर देखील आरोप झाले आहेत.त्यामुळे क्रांती रेडकर आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 


आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप काल मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आज पुन्हा समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी आरोपांचा 'सिलसिला' कायम ठेवला आहे. 





तुमची मेहुणी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना सवाल

Mumbai Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप काल मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. आज पुन्हा समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी आरोपांचा 'सिलसिला' कायम ठेवला आहे. 


नवाब मलिक यांनी ट्वीट करत समीर वानखेडेंना सवाल केला आहे.  समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यामुळे तुम्ही उत्तर द्या. हा घ्या त्याचा पुरावा असं म्हणत ई कोर्ट सर्व्हिसेसवरील काही स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. नवाब मलिक यांनी म्हटलं की, ती महिला कोण तिच्याशी समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे, याबाबत त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. वाचा सविस्तर



एनसीबीचं एक पथक मुंबईतील लोअर परळ परिसरात दाखल

एनसीबीचं एक पथक मुंबईतील लोअर परळ परिसरातील फिनिक्स मॉलजवळ थोड्याच वेळात भेट देणार आहे. याच परिसरात पूजा दादलानी आणि किरण गोसावी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीचं बोलणं झाल्याचं कळतंय. त्यानंतर हेच पथक क्रूझ टर्मिनल वर जाऊन आणखी काही लोकांची चौकशी करतील.

...म्हणून आर्यन खानची एनसीबीच्या SIT चौकशीला दांडी

Cruise Drugs Case : क्रूझ ड्रग्ज प्रकरणी रविवारी एनसीबीच्या एसआयटीनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु, आर्यन खान (Aryan Khan) काल (रविवारी) चौकशीसाठी हजर राहिला नाही. एनसीबीनं आर्यन खानला रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान, चौकशीसाठी हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. पण तरिही आर्यन खान गैरहजर राहिला. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी (NCB) च्या रडारवर असलेला आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचं पालनं करणं आर्यनसाठी बंधनकारक असणार आहे. यातील एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे, आर्यननं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करावं. जर आर्यननं या अटींची पूर्तता केली नाही, तर मात्र आर्यनचा जामीन रद्द होऊ शकतो. असं असलं तरीही आर्यननं काल (रविवारी) एनसीबी कार्यालयात चौकशीला जाणं टाळलं. यावरुन सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय की, आर्यन चौकशीसाठी का उपस्थित नव्हता? याचं कारण आता समोर आलंय. 

पार्श्वभूमी

Aryan Khan Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक करणार आहे. रविवारी प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन खान एनसीबी चौकशीला गौरहजर राहिला. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं. त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह सहा प्रकरणांचा तपास सोपवण्यात आला आहे. 


प्रभाकर शैलला एनसीबीकडून तपासासाठी समन्स 


एकिकडे एसआयटीनं या मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणातील आरोपींची चौकशी सुरु केली आहे. क्रूझ प्रकरणातील आर्यन खानला रविवारी एसआयटीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. परंतु, प्रकृती ठिक नसल्याची सबब देत आर्यन चौकशीसाठी गैरहजर राहिला. आर्यनची प्रकृती ठिक असेल तर आज आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकतो. 


तर दुसरीकडे, एनसीबीच्या एसआयटीनं क्रूझ ड्रग प्रकरणी रविवारी आरोपी अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांचा जबाब नोंदवला. एसआयटी ज्या 6 प्रकरणांचा तपास करत आहे. त्यामध्ये जेवढे आरोपी आहेत, सर्वांना चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं. या 6 प्रकरणांमध्ये आर्यन खान, समीर खान, अरमान कोहली, मुंब्रा येथील प्रकरण ज्यामध्ये MD ड्रग्स जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच जोगेश्वरी येथील प्रकरण ज्यामध्ये 1 किलो चरस जप्त करण्यात आलं होतं. 


दरम्यान, या 6 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक दिल्लीहून मुंबईला पोहोचलं आहे. या पथकात 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकाचं नेतृत्व संजय सिंह करत आहेत. या पथकात एक AD, दोन SP, 10 IO आणि JIO आहेत. दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी समीन वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. एनसीबीचं आणखी एक पथक याच प्रकरणी आपला तपास पुढे सुरु करणार आहे. 


...म्हणून आर्यन खानची एनसीबीच्या SIT चौकशीला दांडी


क्रूझ ड्रग्ज प्रकरणी रविवारी एनसीबीच्या एसआयटीनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. परंतु, आर्यन खान (Aryan Khan) काल (रविवारी) चौकशीसाठी हजर राहिला नाही. एनसीबीनं आर्यन खानला रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान, चौकशीसाठी हजर राहून आपला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले होते. पण तरिही आर्यन खान गैरहजर राहिला. दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबी (NCB) च्या रडारवर असलेला आर्यन खान सध्या जामीनावर बाहेर आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानं त्याला जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या होत्या. या अटींचं पालनं करणं आर्यनसाठी बंधनकारक असणार आहे. यातील एक अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे, आर्यननं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सहकार्य करावं. जर आर्यननं या अटींची पूर्तता केली नाही, तर मात्र आर्यनचा जामीन रद्द होऊ शकतो. असं असलं तरीही आर्यननं काल (रविवारी) एनसीबी कार्यालयात चौकशीला जाणं टाळलं. यावरुन सध्या प्रश्न उपस्थित केला जातोय की, आर्यन चौकशीसाठी का उपस्थित नव्हता? याचं कारण आता समोर आलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.