मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याप्रमाणे मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसत आहे. पण शनिवारच्या तुलनेत आज या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 252 रुग्णांची भर पडली असून केवळ तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 352 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी मुंबईत 176 रुग्णांची भर पडली होती. 


मुंबईत आतापर्यंत एकूण 7,35,954 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97 टक्के इतके आहे. मुंबईत सध्या 2927 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला असून तो 2075 दिवसांवर पोहोचला आहे. शहरातील कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.03 टक्क्यांवर पोहोचला आहे. 


राज्यातील स्थिती
राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 892 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 16 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,063 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


राज्यात सध्या 14,526 इतकी सक्रिय रुग्णसंख्या असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे. 


देशातील स्थिती
मागील 24 तासांत देशात दहा हजार 853 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 526 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 60 हजार 791 इतकी झाली आहे.  12 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 44 हजार 845 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 37 लाख 49 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 


महत्वाच्या बातम्या :