Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 978 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 1896 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 84 हजार 148 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 612 झाली आहे. सध्या मुंबईत 9,710 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 978 रुग्णांमध्ये 924 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 526 दिवसांवर गेला आहे.






सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 9710 सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 5184 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 4382 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 736, रायगड 1267, रत्नागिरी 93, सिंधुदुर्ग 75, सातारा 110, सांगली 88, कोल्हापूर 71, सोलापूर 122, नाशिक 280, अहमदनगर 134, जळगाव 99, धुळे 39, औरंगाबाद 171, जालना 43, बीड 13, लातूर 101, नांदेड 48, उस्मानाबाद 71, अमरावती 40, अकोला 65, वाशिम 203, बुलढाणा 107, यवतमाळ 60, नागपूर 457, वर्धा 32, भंडारा 59, गोंदिया 25, गडचिरोली 31 आणि चंद्रपूरमध्ये 52 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 23996 सक्रिय रुग्ण आहेत.


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या सध्या साडेतीन हजाराच्या घरात स्थिर असल्याचं चित्र आहे. आज राज्यात कोरोनाच्या 3249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 4189 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


संबंधित बातम्या


Mumbai Corona Update : मुंबईत गुरुवारी 1265 रुग्णांची नोंद, 2478 कोरोनामुक्त


Nagpur Covid Update : 13 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू, जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 459 वर