Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 43 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी मुंबईत 44 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये शनिवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 55 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 329 इतके सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,38,819 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 15,187 इतका झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.004 टक्के इतका आहे. 




 मुंबई-पुण्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण -
राज्यात सध्या 626 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत सध्या 329 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर पुण्यात 151 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठाण्यात 42 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगरमध्ये 27 तर बीडमध्ये 14 सक्रीय रुग्ण आहेत. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, औरंगाबाद , हिंगोली उस्मनाबाद, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा या ठिकाणी एकही सक्रिय रुग्ण नाहीत. इतर जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या दहापेक्षा कमी आहे. 


मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद -
राज्यात शनिवारी 98 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमध्ये 43 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे मनपा 18 आणि पिंपरी चिंचवड 10 कोरोना रुग्ण आढळले आहेत. याशिवाय इतर ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आतमध्ये आहे. ठाण्यासह अनेक जिल्ह्यात कोरोनाचा आज एकही रुग्ण आढळला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 98 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. शनिवारी राज्यात 153 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,27,265 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.12% एवढे झाले आहे.