Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 194 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी सात रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 124 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 1002 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,41,472 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 5450 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.012% टक्के इतका आहे.





सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1002 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 305 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 162 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 16, रायगड 46, पालघर 12, नाशिक 12, नागपूरमध्ये 11 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1605 सक्रिय रुग्ण आहेत.


 राज्यात आज 307 रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात आज रुग्णसंख्येने 300 चा आकडा पार केला आहे. आज नव्या 307 रुग्णांची भर पडली आहे तर 252 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,32,81 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे. देशातील कोरोना महामारीच्या संसर्गात सतत चढउतार पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Mumbai Corona Update : मंगळवारी मुंबईत 158 नव्या रुग्णांची भर, 932 सक्रिय रुग्ण


Maharashtra Corona Update : राज्यात आज नवी रुग्णसंख्या 300 पार ; तर 252 रुग्ण कोरोनामुक्त