Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 100 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळावारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 102 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 637 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,39,870 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 8079 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.008 टक्के इतका आहे.





सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 637 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 210 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 92 सक्रीय रुग्ण आहेत. नाशिक 12, अहमदनगर 18,  रायगड 14 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1016 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात आज 182 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार  होताना  दिसत आहे.  सोमवारी राज्यात  182  रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे.  राज्यात सध्या  1027 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 170  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 182 रुग्णांची नोंद तर 170  रुग्ण कोरोनामुक्त


Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, मृत्यूही घटले; गेल्या 24 तासांत 2568 नवे रुग्ण