Mumbai Corona Cases : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रासह मुंबईत कमी होताना दिसत आहे. मुंबईत आज 187 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. 


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,26,549 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,718 झाली आहे. सध्या मुंबईत 1,711 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 187 रुग्णांमध्ये 174 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2962 दिवसांवर गेला आहे.






सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1711 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1370 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1437 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 146, रायगड 337, रत्नागिरी 70, सिंधुदुर्ग 48, सातारा 70, सांगली 53, कोल्हापूर 74, सोलापूर 39, नाशिक 174, अहमदनगर 88, धुळे 11, औरंगाबाद 23, जालना 25, लातूर 54, नांदेड 13, उस्मानाबाद 44, अकोला 30, वाशिम 33, बुलढाणा 20, नागपूर 127, भंडारा 17, गडचिरोली 30 आणि चंद्रपूरमध्ये 110 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 6,220 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात 701 कोरोना रुग्णांची नोंद


राज्यात आज 701 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1,056 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे.


संबंधित बातम्या


Covid19 Updates : दिलासादायक! कोरोना रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही घटलं, देशात 5076 नवे रुग्ण, तर 11 जणांचा मृत्यू


Mumbai Corona Cases : मुंबईत शनिवारी 209 रुग्णांची नोंद, 394 कोरोनामुक्त