LIVE Updates : मुंबई, महाराष्ट्राचा अपमान होत असताना देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का, भाई जगताप यांचा सवाल

Congress Protest Mumbai : PM मोदी यांनी केलेल्या वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

abp majha web team Last Updated: 14 Feb 2022 11:45 AM
मुंबईतील आजचे भाजपविरोधी आंदोलन थांबवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा

मुंबईतील आजचे भाजपविरोधी आंदोलन थांबवले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची घोषणा, मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेता काँग्रेसचे आंदोलन स्थगित

मुंबई, महाराष्ट्राचा अपमान होत असताना देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का, भाई जगताप यांचा सवाल

Mumbai Congress Protest : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान होत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मूग गिळून गप्प का?  असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांना विचारला.

मुंबई: केम्प कॉर्नर परिसरात ठिय्या आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Congress Protest : केम्प कॉर्नर परिसरात ठिय्या आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजपचेही प्रतिआंदोलन; केम्प कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी

Mumbai Congress Protest : काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात भाजपचेही प्रतिआंदोलन; केम्प कॉर्नर परिसरात जोरदार घोषणाबाजी, खासदार गोपाळ शेट्टी यांचा रस्त्यावरच ठिय्या

स्वत: चे महत्त्व वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वसुली बंद करावी, भाजप आमदार राम कदम यांचा टोला

Mumbai Congress Protest : स्वत: चे महत्त्व वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वसुली बंद करावी, हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे; भाजप आमदार राम कदम यांचा टोला. 

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात; 'सागर' बंगल्याजवळून घेतलं ताब्यात

Mumbai Congress Protest : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे 'सागर' बंगल्याजवळून पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

पोलिसांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अटकाव

Mumbai Congress Protest : पोलिसांकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बंगल्याबाहेर अटकाव, मलबार हिल परिसरात न जाण्याचे केले आवाहन 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारकऱ्यांसह आंदोलन करणार

Mumbai Congress Protest : वारकऱ्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंदोलन करणार, देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याकडे थोड्याच वेळेत निघणार

आंदोलन तर होणार, काँग्रेस ठाम; पोलीस बंदोबस्तात वाढ

Mumbai Congress Protest : देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निर्धार

काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देणार; भाजप नेत्यांचा इशारा

काँग्रेसने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. 

मुंबईत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने येणार?

महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभरात कोरोना पसरला, या मोदींच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलाय. काँग्रेस नेते आज सकाळी ११ वाजता देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहे.. 

पार्श्वभूमी

Congress BJP protest in Mumbai : काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष आज मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.  पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिल्यानं संघर्ष अटळ असल्याचं दिसतं. सागर' बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम आहेत. आम्ही 100 ते 150 कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. 


काँग्रेस आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी काही वेळापूर्वी धरपकड केली. नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  त्यामुळे नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर त्याचा पुढील अंक आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह  मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी होणार आहेत. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उलटा प्रसाद देण्याचा इशारा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.


भाजपकडून वाहतूक कोंडी आणि गोंधळ; नाना पटोले यांचा आरोप 


मलबार हिल परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून वाहतूक कोंडी केली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने सगळे आमदार आणि कार्यकर्त्यांना जमा केले आहे. गोंधळाची स्थिती आमच्याकडून नव्हे तर भाजपकडून निर्माण करण्यात आली असल्याचे पटोले यांनी सांगितले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.