पेपर चेकिंगसाठी मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद
एबीपी माझा वेब टीम | 28 Jul 2017 09:13 AM (IST)
31 जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासायचे असल्यामुळे आणखी चार दिवस महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबई : 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचं आव्हान खांद्यावर घेतलेल्या मुंबई विद्यापीठाकडून इतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान सुरुच आहे. पेपर तपासण्यासाठी आणखी चार दिवस महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तर पत्रिका तपासण्याच्या कामात प्राध्यापक व्यस्त राहणार असल्यामुळे 31 जुलैपर्यंत मुंबईतील कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला आहे. त्यामुळे पुढचे 4 दिवस कॉमर्स, आर्ट्स आणि लॉच्या विद्यार्थ्यांना घरीच बसावं लागणार आहे.