Mumbai College Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगर क्षेत्र परिसरातील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून मुंबईतील 1 लाख 36 हजार 229 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरी अंतर्गत प्रवेश ॲलॉट करण्यात आले आहेत. तब्बल 57 हजार 323 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमानुसारच प्रवेश मिळाला आहे. 


मुंबई महानगर क्षेत्र परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 2 लाख 36 हजार 520 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 2 लाख 15 हजार 753 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरला होता.  मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या 32 हजार 678 जागा, कॉमर्स शाखेच्या 1 लाख 23 हजार 627 जागा तर सायन्स शाखेच्या 76 हजार 897 जागा उपलब्ध आहेत.


पहिला पसंतीक्रम भरलेल्या 57 हजार 323 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून दुसऱ्या पसंती क्रमानुसार 21 हजार 934, तिसऱ्या पसंती क्रमानुसार 15 हजार 63, चौथ्या प्रसंती क्रमानुसार 11 हजार 722, पाचव्या पसंती क्रमानुसार 9 हजार 320, सहाव्या पसंती क्रमानुसार 6 हजार 749, सातव्या पसंती क्रमानुसार 5 हजार 168 ,आठव्या पसंती क्रमानुसार 3 हजार 843, नवव्या पसंती क्रमानुसार 2 हजार 888, तर दहाव्या पसंती क्रमानुसार 2 हजार 219 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.


नामवंत महाविद्यालयातील कटऑफ नव्वदहून अधिक दिसून आले आहेत. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. यंदा दोन लाख 33 हजार 563 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांबरोबर कला आणि वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्ये यंदा वाढ झाली आहे. 


यंदा केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. बारावीला राज्य मंडळाची नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होती. त्याचा काही ठिकाणी परिणाम कटऑफवर झाल्याचेही महाविद्यालयाकडून सांगण्यात येतंय. 


पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी 27 जून पर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष जावून प्रवेश घ्यावे लागणार आहेत.


Mumbai College Admission: मुंबईतील नामांकित कॉलेजच्या कट ऑफ वर एक नजर टाकूया 


एच आर कॉलेज, चर्चगेट -
कॉमर्स - 93.4 %


एन एम कॉलेज - 
कॉमर्स -93.6%


सेंट झेवीयर्स कॉलेज
आर्टस् - 94.6 %
सायन्स -91%


रुईया कॉलेज -
आर्टस् - 92.8%
सायन्स- 92.2%


मिठीबाई कॉलेज-
आर्टस् - 87.8%
कॉमर्स--91.2%
सायन्स- 88.6%


पोदार कॉलेज
कॉमर्स -93%


रुपारेल कॉलेज
आर्टस् -87%
कॉमर्स- 89.4%
सायन्स-90.6


के सी कॉलेज -
आर्टस् - 87%
कॉमर्स--91.6%
सायन्स-87.4%


जय हिंद कॉलेज -
आर्टस् - 91.2 %
कॉमर्स--92.4%
सायन्स-88.2% 


ही बातमी वाचा: