Mumbai CNG Gas: मुंबई व उपनगरातील नागरिकांना मागील दोन दिवसांपासून सीएनजीच्या (CNG) तुटवड्याचा मोठा फटका बसला असून, रिक्षा-टॅक्सी चालकांपासून सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचेही हाल होत आहेत. मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल (GAIL) गॅसच्या मुख्य पाइपलाईनमध्ये रविवारी दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) परिसरातील सीएनजी पुरवठा विस्कळीत झाला. या बिघाडामुळे अनेक सीएनजी पंप बंद पडले आणि उघड्या असलेल्या काही पंपांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.

Continues below advertisement

रविवारीपासून बंद असलेला पुरवठा सोमवारी आणि आज (मंगळवारी) ही पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. महानगर गॅस लिमिटेडनुसार, पाइपलाईनची दुरुस्ती अजूनही युद्धपातळीवर सुरू आहे. सीएनजी वापरकर्त्यांना अडचण होऊ नये म्हणून पर्यायी पुरवठा व्यवस्था करण्यात आली आहे. शक्य तितके सीएनजी पंप सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही पुरवठा कमी असल्याने सीएनजी पंपांवर मोठ्या रांगा दिसून येत आहे. 

Mumbai CNG Gas: नवी मुंबई आणि ठाण्यातही परिणाम

नवी मुंबईतील काही पंप काल रात्रीपासून सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी अजूनही पंप बंद आहेत. ठाण्यातही दोन दिवस सलग सीएनजी उपलब्ध नसल्याने रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प झाली होती. आता ठाण्यात हळूहळू पुरवठा पूर्वपदावर येत आहे, मात्र रांगा अजूनही कमी झालेल्या नाहीत.

Continues below advertisement

Mumbai CNG Gas: चालकांना नाहक त्रास 

रिक्षा व टॅक्सी चालकांना सीएनजी न मिळाल्याने गाड्या उभ्या ठेवाव्या लागत आहेत. रोजची कमाई ठप्प झाली आहे. सीएनजीसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. खोपट परिसरातील पंपावर तर पहाटेपासून मोठी रांग लागलेली दिसून येत आहे. सीएनजी तुटवड्याचा थेट परिणाम प्रवाशांवर झाला आहे  रिक्षा-टॅक्सी कमी मिळत असल्याने भाडेवाढ आणि प्रतीक्षासुद्धा वाढली आहे. कुर्ला स्टेशन, ठाणे स्टेशनसह अनेक ठिकाणी प्रवासी दीर्घकाळ रिक्षाची वाट पाहत उभे असल्याचे चित्र दिसले आहे. विद्यार्थ्यांनाही उशीर होत असल्याने गैरसोयी वाढल्या आहेत.

Mumbai CNG Gas: पुरवठा हळूहळू सुरळीत होत असला तरी…

MGL कडून पर्यायी पुरवठा सुरू केल्यामुळे काही पंप सुरू झाले आहेत आणि सीएनजी मिळू लागली आहे. मात्र पुरवठा मर्यादित असल्याने रांगा कमी झालेल्या नाहीत. पूर्ण स्थिती पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांसह प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.

आणखी वाचा 

Supreme Court On Local Body Election: अन्यथा निवडणुकाच रोखू...सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला गंभीर इशारा; नेमकं काय घडलं?