मुंबई : ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जितक्या सवलती मिळतात, तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन करताना दिली. 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना ही सवलत मिळणार आहे. मराठा मोर्चाबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदन दिलं.


मागासवर्गीय आयोगाकडे आपण याचा पाठपुरावा करणार असून ठराविक मुदतीत अहवाल देण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्या :

  • ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज ही योजना आणली जाईल.

  • अण्णासाहेब पाटील महामंडळाचे तीन लाख तरुण स्कील ट्रेनिंग देणार आहेत.

  • दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार.

  • प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलसाठी पाच कोटी रुपये दिले जाणार आहेत.

  • मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 6 लाखांच्या ईबीसी मर्यादेसाठी 60 टक्के गुणांची अट 50 टक्क्यांवर आणली.

  • 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत मिळेल.

  • आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल.


कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटला अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यावर अंतिम युक्तिवाद सुरु होईल. सरकारकडून कोणताही उशीर होत नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.