देसाई-मेहतांचं राजीनामानाट्य, मुख्यमंत्र्यांनी राजीनामे फेटाळले
एबीपी माझा वेब टीम | 12 Aug 2017 05:35 PM (IST)
सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
NEXT PREV
मुंबई : पारदर्शक कारभाराचा डंका वाजवणारे मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न पडला आहे. घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी राजीनामा देऊ केल्याची माहिती पुढे आली आहे, तर शनिवारी सुभाष देसाईंनीही राजीनाम्याची तयारी दाखवली. दोन्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी वाचवलं आहे. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे.