मुंबई: चेंबूरच्या (Chembur Accident) डायमंड गार्डनजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या महिलेनं आपल्या कारनं तीन जणांना उडवलंय. या धडकेत तीन जण गंभीर जखमी झालेत. मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात येत असताना हा सगळा प्रकार घडला. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर महिला ही कुर्ल्याची रहिवासी असून व्यवसायाने आर्किटेक आहे. मध्यरात्री ती मद्यधुंद अवस्थेत  तिची मोटर कार चालवत मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात निघाली होती. महिला बेफामपणे गाडी चालवत होती. दरम्यान, कार  डायमंड गार्डनजवळ आली असता महिलेचा गाडीवरचा ताबा सुटला आणि दुचाकीवरून समोर स्कूटीवर असलेल्या  जैस्वल कुटुंबाला उडवले. हर्ष जैस्वाल,समृद्धी जैस्वाल, दिपू जैस्वाल यांना तिने जोरदार धडक दिली. यामध्ये हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मद्यधुंद असलेल्या त्या तरुणीला चेंबूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कारचालक महिला पोलिसांच्या ताब्यात 


मात्र सदर महिलेवर स्थानिक नागरिकांनी राग व्यक्त करत तिला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले.या पुढील तपास चेंबूर पोलीस ठाणे करत आहे. अपघातानंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारचालक महिलेला ताब्यात घेतले.  चेंबूर परिसरात झालेला अपघात चिंतेची बाब ठरत आहे. चौकात झालेल्या अपघातामुळे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. वाहनांची झालेली अवस्था पाहता अपघाताची भीषणता लक्षात येते.   


टेक कंपनीच्या सीईओचा मृत्यू


वरळी सीफेसवर पतीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्ही कारने जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. डेअरीजवळ रविवारी सकाळी साडेसहा वाजता हा अपघात झाला. राजलक्ष्मी रामकृष्णन असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. संबंधित महिला ही एका टेक कंपनीची सीईओ होती.  शिवाय त्या फिटनेस फ्रीक असून शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपच्या एक भाग होत्या, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.


हे ही वाचा :                          


Kolhapur News : देवदर्शनासाठी बहिण, भाच्याला घेऊन निघाले अन् वाटेत काळाचा घाला; कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी अंत