मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादर ते माटुंगा दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक तासाभरापासून वाहतूक खोळंबली झाली आहे.
या खोळंब्यामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे हाल झाले आहेत. मध्य रेल्वेच्या सर्व स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. रुळ दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे, परंतु कधीपर्यंत हे काम पूर्ण होईल, हे अद्याप स्पष्ट नाही.
आज संध्याकाळी 6.10 मिनिटांनी माटुंगा-दादर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला. त्यामुळे सीएसटीवरुन कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. परिणामी धिम्या मार्गावरील गाड्याही उशिराने धावत आहेत.